Quotes by RS in Marathi


१) आपल्या आई-वडीलांची निस्वार्थपणे सेवा करत राहा.

२) नेहमी दुस-यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही स्वत: आनंदी राहाल.

३) घड्याळा प्रमाणे स्वत
:ला वेळेवर चालण्याची सवय लावा.

४) नियमीत व्यायाम, प्राणायाम व योगासने करा.

५) समोरच्या व्यक्तीचं म्हणनं पहील्यांदा ऐकून घेण्याची सवय स्वत
:ला लावा.

६) आपल्या इच्छेप्रमाणे गरजु व्यक्तींना मदत नक्की करा.

७) कुणाबद्दलही मनामध्ये राग ठेवू नका.

८) आयुष्यात कधीही भ्रष्ट व्यक्ती बनू नका.

९) कोणतीही वस्तू खरेदी करण्यापुर्वी त्या वस्तूची गरज आहे की
, चैन हे ओळखा.

१०) कुठल्याही व्यसनाला बळी पडू नका कारण हे फक्त तुमचाच नाही तर तुमच्या पुर्ण संसाराचा विनाश करतात.

११) आजचा दिवस हा आपल्या जिवनाचा शेवटचा दिवस आहे असे समजून जिवन आनंदाने
जगा. 

१२) तुम्ही शिकून सवरुन आकाशात जा किंवा पाताळात जा पण आपल्या प्रियजनांना विसरु नका.

१३) आपला जन्म हा इतरांची सेवा करण्यासाठी झालेला आहे याची जरा जाणीव असू दया.

१४) सोशल नेटवर्कींग साईटचा वापर हा आपल्या जेवणातील मीठाच्या वापरापेक्षाही कमी करावा
.

१५) विज्ञाना कडून शाप घ्यायचा की वरदान हे तुम्हीच ठरवा.

१६) इतरांचे मनं दुखतील असे काही बोलू नका.

१७) तुम्हाला शक्य होईल तेवढी मदत इतरांना करा तुम्हाला कधीही कशाचीही कमी भासणार नाही.

१८) जिवनात काही करुन दाखवायचे असेल तर स्वत:लाच प्रश्न विचारा व स्वत:च उत्तर शोधा.


१९) लग्नानंतर पतीने आपल्या मैत्रीण आणि पत्नीने  मित्र दूर ठेवावे, तुमचा संसार नक्की चांगलाच होइल. 

२०) आपल्या एकूण पगारापैकी कमीत कमी ३०% रक्कम बचत करा व उरलेली रक्कम गुंतवणुक व खर्चासाठी वापरा.

२१) तुमच्याजवळ जे काही ज्ञान असेल ते इतरांना दया.

२२) मिळालेली संधी सोडू नका मग ती छोटी असो वा मोठी.

२३) तुम्ही अगोदर इतरांना प्रेम दया म्हणजे तुम्हाला प्रेम आपोआपच मिळेल.

२४) भटकलेल्यांना चांगला मार्ग दाखवा.

२५) मनुष्य हा सवयीचा गुलाम असतो. म्हणून नेहमी चांगल्या सवयी लावा.

२६) चूक झाली असेल तर अगदी मनापासून माफी मागा, समोरची व्यक्ती तुम्हाला नक्की माफ करेल.

२७) आपल्या परिवारा सोबत वेळ घालवल्याने जो आनंद मिळतो तो आनंद इतर कोणत्याही गोष्टीपासून मिळत नाही.

२८) न आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न करुन ५०% दुखी राहण्यापेक्षा लग्न न करता १००% सुखी राहणे केव्हाही योग्य.

३०-०५-२०१५ 

२९) खरे बोलल्याने कदाचित थोड़ा तरस होतो पण त्याचा परिणाम हा नेहमी चांगलाच असतो. 

३०) मानाविरुद्ध जमवलेले नाते कधीही टिकट नाही आणि मनापासून जमवलेले नाते कोणत्याही परिस्तितीत टिकटे.

३१) रोज व्यायाम करा, प्राणायाम करा, व योग असणे करा आणि मग स्वस्थ राहा मस्त राहा. 

३२) कोणत्याही नात्यामध्ये जास्त अपेक्षा ठेऊ नये. 

३१-०५-२०१५
३३) तुम्ही सदैव तयार राहा कारण संधी केव्हाही चालून येऊ शकते. 

०१-०६-२०१५
३४) हातात अधिकार असला तर मनुष्याने त्याचा चांगला वापर केला पहिजे. 

 ०२-०६-२०१५
३५) प्रत्येक पालकाने आपल्या मुलांचे फक्त खाण्या-पिण्याचे लाड करावे म्हणजे पुढे चालून तुम्हाला त्रास होणार नाही. 

०३-०६-२०१५
३६) जीवनामध्ये पैशाला कधीही किंमत देऊ नका कारण पैसा हा सर्वकाही नसतो. 

३७) व्यक्ती चुकत असेल तर त्या व्यक्तीची चूक लक्षात आणून दया. 

०५-०६-२०१५
३८) पती-पत्नीच्या नात्यात एकनिष्ठता असली कि नात्यात किंचितही गैरसमज होत नाही. 

०७-०६-२०१५
३९) नात्यामध्ये जास्त अपेक्षा ठेऊ नका म्हणजे ते नातं शेवटपर्यंत टिकेल. 

४०) मनुष्याने नेहमी जीवनात समाधानी असले पाहिजे. 

४१) किती दुर्दैवी अवस्था आहे ना कि, सत्य हे मोठ्याने आणि वारंवार सांगावे लागते. 

११-०६-२०१५
४२) आपण ज्या व्यक्तीमध्ये त्यांच्या वाईट गुणांचा शोध घेतो त्या वेळेला आपल्याला फक्त त्या व्यक्तीमधील वाईट गुणच दिसतील, म्हणून व्यक्तीमध्ये नेहमी चांगले गुण शोधा म्हणजे तुम्हाला चाग्लेच गुण दिसतील. 

४३) माणसाने स्वतः प्रती प्रामाणिक असले पहिजे. 

१२-०६-२०१५
४४) ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे  त्यांचा विश्वासघात  कधीच करू नका. 


२१-०६-२०१५
४५) चुका करा पण त्यातून नक्की शिका. 

२३-०६-२०१५
४६) शिक्षक हे एक मुर्तिकार असतात, कारण ते चांगलं व्यक्तीमत्व घडवण्याचे काम करतात.

२४-०६-२०१५
४७) मनुष्य कधीही वाईट नसतो, खरं तर ते परिस्थितीवर अवलंबून असते.


२५-०६-२०१५
४८) जीवनभर न पुरणाऱ्या व्यक्ती किंव्हा वस्तूंचा गर्व कधीही करू नये. 


४९) पृथ्वीतलावरील कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नाही.

२६-०६-२०१५
५०) होऊन गेलेल्या गोष्टींवर विनाकारण वाद घालणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.

५१) काही विचारी लोक शालेय जीवनात मिळालेल्या गुणात नाही तर मिळवलेल्या ज्ञानात विश्वास ठेवतात.

२७-०६-२०१५
५२) काही मनुष्यप्राणी आपल्या चुका स्पष्टपणे सांगायला घाबरतात.

२८-०६-२०१५
५३) केलेली मदत कधीही बोलून दाखवू नये.

३०-०६-२०१५
५४) मन सुंदर ठेवा चेहरा आपोआप सुंदर होईल.

०१०७-२०१५
५५) लग्न हे एक जीवनातील सुखद क्षणांपैकी एक आहे, त्यामुळे लग्न करतांना योग्य निर्णय घ्या. 

५६) एखादया गोष्टीबद्दल ठाम विचार केला असेल तर ती गोष्ट नक्की करा कारण तेव्हा यश मिळवणे हे आपल्या स्वतःच्या हातात असते. 


०३-०७-२०१५
५७) जिथे आई-वडिलांची छाया असते, बहिण-भावाचे प्रेम असते, पती-पत्नी च्या नात्यात विश्वास असतो आणि लहान मुलांना शिस्त लागलेली असते त्याला घर असे म्हणतात. 

५८) प्रेम म्हणजे निर्मळ मनाने समोरच्या व्यक्तीचा त्याच्या गुण-दोषांसह केलेला स्विकार. 


५९) प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थी असतोच. 

६०) पती-पत्नी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

०४-०७-२०१५
६१) काही गोष्टी काही व्यक्तींना सांगून समजतात म्हणून त्या स्पषटपणे सांगाव्या. 


०५-०७-२०१५
६२) घरातील मोठी लोक जसे बोलतात, वागतात तेच अनुकरण लहान मुलं करतात. 

६३) स्वत:च्या स्वार्थातून इतरांच भलं करणे याला म्हणतात चांगुलपणा आणि इतरांचे भले करण्यासाठी स्वत:चे नुकसान करणे याला म्हणतात मुर्खपणा.

०८-०७-२०१५
६४) जीवनात आई चे प्रेम, बहिणीचे प्रेम आणि पत्नीची साथ असेल तर तुमची प्रगती निश्चित आहे.


६५) प्रगती म्हणजे गती अगोदरची तयारी. 


६६) माणसाची प्रगती ही नेहमी हळू-हळू होत असते.