आत्मचरित्र `

।।  मातृ पितृ देवो भवं   ।।

…… सुरुवात खऱ्या जीवनाची

आज मी खूप आनंदी आहे कारण मला माझे स्वत:चे आत्मचरित्र लिहायचे होते आणि त्याची सुरुवात मी आज दि.  २९-०५-२०१५ रोजी केली आहे.


सुरुवातीला अशा व्यक्तींचे आभार ज्यांनी माझ्या आयुष्याला वळण देण्यास मदत केली. खरच मी या सर्व आपल्या लोकांचा खूप ऋणी आहे आणि सदा राहील. 

आई -
     आई…… आई म्हटले कि मला दुसरे काहीच नको असते; कारण माझी आई अतिशय प्रेमळ, मनमिळाऊ, कुणाच्याही मनाला ठेच न पोहचवणारी आणि सर्वांशी अतिशय आनंदाने राहणारी………। खरं तर मी माझ्या आईबद्दल जे काही सांगेल ते कमीच असेल. पण माझी आई खरच महान आहे. खरं तर सर्वच आई महान असतात पण मला माझी आई सर्वात जास्त आवडते कारण ती मला म्हणजे आम्हा सर्वांना चुकले असेल तर बोलते आणि आम्हाला तिच्या बोलण्याचा कधीही राग येत नाही. आम्ही खरं तर ४ सक्के भाऊ-बहिण; पण माझ्या आईला आम्ही जवळ-जवळ २२-२३ जण आईच म्हणतो आणी त्यात चक्क माझे २ मित्र हि माझ्या आईला आई च म्हणतात. मला त्याचा फार अभिमान वाटतो. माझ्या आईने कधीही मुलगी आणि सुन यांच्यात भेदभाव केला नाही. आणि कधी तसा भेदभाव करणार देखील नाही हा माझा विश्वास आहे म्हणून तर मी अभिमानाने म्हणतो कि माझी होणारी पत्नी हि नशीबवानच असेल.
     तसेच आई बद्दल कीतीही बोलले तर ते कमीच पडेल. मी माझ्या आई च्या जीवनावर "माझी आई माझं सर्वस्व" नावाचे पुस्तक लिहीणार आहे, तर मग आमच्या आईबद्दल आपण त्या पुस्तकात बघुच.


वडील -
     वडील म्हटले की, एक आधार असे आपण म्हणत असतो परंतु आम्हा भावंडांना आमच्या वडीलांकडून जो आधार हवा होता तो कधीच मिळाला नाही आणि याचे मला फार दुर्दैव वाटते आणि अगदी मनापासून वाटते की असे दुर्दैव कुणाच्याही नशीबी यायला नको. वाचकांनो मला खरं बोलायला फार आवडतं आणि असे म्हटले जाते की खरं बोललं की बरं वाटत नाही. पण खरं हे खरच असतं त्याला कुणीही नाकारु शकत नाही आणि हे सर्व मी पुराव्यासकट तुम्हा विचारी लोकांना पटवून देऊ शकतो. आणि म्हणून मी "माझा बाप आणि मी" या पुस्तकात मी अशा एका व्यक्तीचे चरीत्र तुमच्या दृष्टीक्षेपास टाकणार आहे आणि मला विश्वास आहे की हे पुस्तक ज्या वेळेला तुम्ही वाचाल त्या वेळेला तुमच्या डोळ्यातून अश्रू  बाहेर पडतीलच.

बहिणी - 
     बहिण म्हटली कि, ते सकाळी केलेलं भांडण आणि दुपारी एकाच ताटात जेवण. किती छान नातं आहे न बहिण भावाच. खरच बहिण हि प्रत्येकाला असायला हवी म्हणजे जो आनंद आपल्याला होतो तोच आनंद इतर भाऊ देखील घेऊ शकतील. माझ्या दोघं बहिणी खरच खूप चांगल्या आहेत आणि मी त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ करणार आहे. 

भाऊ - 
     भाऊ म्हणजे एक वडिलांनंतरचा एक आधार च असतो. माझा भाऊ हा खूप चांगला आहे कारण तो त्याच्या परिवाराची खूप काळजी घेतो.  

शिक्षक - 
     शिक्षक म्हटले तर माझ्या मते आपले दुसरे गुरु. कारण आपला पहिला गुरु हि आपली आईच असू शकते. जसे आई आपल्या मुलांना संस्कारी बनवत असते तसेंच शिक्षक देखील आपल्या विद्यार्थ्यांना संस्काराची जान करून देत असतात. काही शिक्षक तर आपल्या विद्यार्थ्यांना आपले मुल समजून त्यांची काळजी घेत असतात तर काही शिक्षक विद्यार्थ्यांना विद्यार्थी समजात नसून त्यांना मित्र समजतात आणि त्यांना वेळोवेळी सत्याची जाणीव करून देत असतात. मी स्वतः एक शिक्षक आहे (होतो) आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी समजात नसून त्यांना मित्रच समजात होतो जेणेकरून मला त्यांच्याशी संवाद करायला जास्त आवडे कारण कुठेतरी अश्या वेळेला विद्यार्थी पण त्या शिक्षकाला मित्र समजून आपल्या अडचणी बिनधास्तपणे सांगत असतो / असते आणि मग अश्या वेळेला शिक्षक त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत असतात आणि मग तिथून खरा विद्यार्थी हा घडत असतो असे मला वाटते. 

बच्चे कंपनी - 
      लहान मुलं म्हटले कि घरात किती आनंद असतो; तसेच मी माझ्या जीवनात लहान मुलांना फार जीव लावतो मग तो मुल कुणाचे हि असो, आणि गुपचूप त्या लहान मुलाच्या / मुलीच्या कानात एक जीवन जगण्याचा मंत्र मी सांगत असतो, जेणेकरून भावी पिढी हि मला जशी हवी आहे तशी घडेल आणि एके दिवशी सर्वांचे कल्याण च होईल. ज्या दिवशी असा दिवस येईल त्या दिवशी हा रणजीत मि. वि . सुर्यवंशी त्या मुलांच्या नजरेत अमर झालेला असेल. आणि मी नेहमी ज्या वेळेस घरातील लहान मुलांना किंव्हा बाहेरच्या लहान मुलांना काही खाऊ देतो त्या वेळेला त्या खाऊ मधील पहिला घास हा मी खात असतो, त्याचे एक खास कारण आहे ते आपण पुढे बघूच.

मित्र परिवार -
      जीवनामध्ये चांगल्या मित्रांची  सांगत भेटली कि जीवन हे सफल होत असते. त्याचप्रकारे माझ्याही जीवनात मला  प्रकारचे मित्र भेटले पण मी वेळ सावरून त्या मित्रांमधील चांगल्या मित्रांना जवळ केले आणि नको असलेले मित्र दूर केले. मित्रहो प्रत्येकाच्या जीवनात मित्र हा असलाच पाहिजे कारण आपण ज्या गोष्टी आई - वडिलांजवळ काही गोष्टी आपण शेअर नाही करू शकत आणि मग त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळत नाही आणि तेच जर आपण आपल्या मित्रांजवळ शेअर केले तर कदाचित आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. आणि वेळोवेळी मित्र हे मदत देखील करतात. माझ्या जीवनात चांगले मित्र आले, त्यांचे माझ्या जीवनातील स्थान अतिशय महत्वाचे होते आणि आजदेखील आहे म्हणून मी माझ्या सर्व मित्रांचा ऋणी आहे. 

जीवा-भावाची मैत्रीण -
     मी २०१२ मध्ये असे ठरवले होते कि माझ्या जीवनात फक्त एकच मुलगी अशी यावी जी मला वेळोवेळी समजून घेईल, माझ्या भावना जाणून घेईल, जिच्याजवळ मी माझे सर्व गुपिते उघड करू शकेल, जी माझ्या जीवनातील एकुलती एक सर्वात जवळची मैत्रीण, प्रेयसी मग पत्नी असेल आणि मला आयुष्यभर साथ देईल. 

मी स्वतः - 
     मी रणजीत मि. वी. सुर्यवंशी सौ. मिराबाई विक्रम सुर्यवंशी यांचा मुलगा. जात पुरुष्याची धर्म माणुसकीचा आणि स्वतःला जगावेगळा समजणारा. पैश्यापेक्षा माणसाला जास्त किंमत देणारा आणि कधीही कुणाच्या अपंगत्वावर न हसणारा, सदा सर्वदा स्वतः अगोदर इतरांचा विचार करणारा, अर्थात याची प्रचीती तुम्हाला पुढे होईलच. मी मे २००९ साली असे ठरवले होते कि जीवनात काहीतरी वेगळे करून दाखवायचे आणि तेही कमी वयात आणि ते मी वयाच्या २५ साव्या वर्षी करून दाखवले; असे मला वाटते.



माझ्या आयुष्यातील पहिला दिवस (जन्म ) - 
आजही मला तो दिवस आठवतो ज्या दिवशी आई ने मला सांगितले कि जेव्हा तुझा जन्म झाला त्या वेळेला तुझ्या शरीरावर टाकायला कापड सुद्धा जवळ नव्हता. तर दवाखान्यातील सिस्टर ने आईला दुस-या बाई जवळचा कापड आणून दिला व आई ने तो कापड माझ्या शरीरावर टाकला. तर अश्या प्रकारे माझ्या आयुष्याची सुरुवात झाली आणि हे सर्व मला माझ्या आईने २४ वर्ष्यानंतर सांगितले. आणि मला माझ्या एका प्रश्नाचे उत्तर कळले कि, मला सतत दुस-या चे दु:ख पाहून मनाला वाईट का वाटत होतं ते. कोणीतरी म्हटले आहे चांगली भावना हि जन्मतः आणि रक्तात असावी लागते. तर अश्या पद्धतीने माझ्या जीवनाची सुरुवात झाली. 

बालपण - 


शैक्षणिक  - 

तरुणपण  - 

वयाची पंचविसी  - 

आयुष्यातील  अनपेक्षित काळ  - २४ मार्च २०१६ ते --------

वयाची  पन्नाशी - 

वयाची  पंच्यात्तरावी -

आयुष्याचे शतक -    

माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस  (मृत्यू ) -