सुखी जीवनाचा मुलमंत्र

लेखण दि. डिसेंबर २०१४ 


आपल्या आई-वडीलांची निस्वार्थपणे सेवा करत राहा.

नेहमी दुस-यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही स्वत: आनंदी राहाल.

घड्याळा प्रमाणे स्वत:ला वेळेवर चालण्याची सवय लावा.

नियमीत व्यायाम, प्राणायाम व योगासने करा.

समोरची व्यक्तीचं म्हणनं पहील्यांदा ऐकून घेण्याची सवय स्वत:ला लावा.

आपल्या इच्छेप्रमाणे गरजु व्यक्तींना मदत नक्की करा.

कुणाबद्दलही मनामध्ये राग ठेवू नका.

 आयुष्यात कधीही भ्रष्ट व्यक्ती बनू नका.

कोणतीही वस्तू खरेदी करण्यापुर्वी त्या वस्तूची गरज आहे की, चैन हे ओळखा.

कुठल्याही व्यसनाला बळी पडू नका कारण हे फक्त तुमचाच नाही तर तुमच्या पुर्ण संसाराचा विनाश करतात.

आजचा दिवस हा आपल्या जिवनाचा शेवटचा दिवस आहे असे समजून जिवन आनंदाने जगा.


लेखन -
रणजीत विक्रम सुर्यवंशी
मु. पो. खरजई ता. चाळीसगाव
www.ranjitsurya.blogspot.in
www.kharjai.in