विचार करायला लावणारा , ह्रदयाला भिडवणारा....... तिचा फक्त एकच प्रश्न


विचार करायला लावणारा ,
ह्रदयाला भिडवणारा.......
तिचा फक्त एकच प्रश्न ....... देह
माझा ,
हळद तुझ्या नावाची .
हात माझा ,
मेहंदी तुझ्या नावाची . भांग
माझा ,
सिंदूर तुझ्या नावाचा .
माथा माझा ,
बिंदिया तुझ्या नावाची . नाक
माझे ,
नथ तुझ्या नावाची .
गळा माझा ,
मंगळसूत्र तुझ्या नावाचे . मनगट
माझे ,
(बांगड्या)
चुडा तुझ्या नावाच्या .
पाय माझे ,
जोडवी तुझ्या नावाची .
आणि हो.....
वडीलधा-यांच्या
पाया मी पडते ,
आणि ......
अखंड सौभाग्यवती भव ।
आशिर्वाद मात्र तुला.
वटपौर्णिमेचे व्रत माझे ,
आयुष्याचे वरदान तुला .
घराची काळजी घ्यायची मी,
दरवाजावर नावाची प्लेट
तुझी.
नाव माझे ,
पण त्यापुढे ऒळख तुझी .
इतकच काय .......
ऊदर माझे ,
रक्त माझे ,
दूध माझे,
आणि मुलं ?
मुलं तुझ्या नावाची .
माझं सगळच तर,
तुझ्या नावाचं......
तक्रार नाही ...
प्लिज रागाऊही नकोस,
अत्यंत नम्रपणे
एक प्रश्न विचारतेय..
एवढच सांग.....
तुझ्याकडे काय आहे का रे,
माझ्या नावाचं ?
°°°आई-बाबा मित्र
मैत्रिणी सोडून
आली तुझ्या घरी°°°
°°°तिचे मन
सांभाळायची आता कोणाची जबाबदारी°
°°
°°°अनोळख्या कुटुंबात
इतकी ती एकरुप होते°°° °°
°स्वतःची काही आवड
होती हेच मुळी विसरुन जाते°°° °
°
°अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील
का°°°
°°
°तिच्या मनाचा थोडातरी विचार
जरा करशील का°°°
°°°कधी सकाळी लवकर उठून
चहा तिला नेऊन दे°°° °°
°वाफाळता गरम उपमा हळूच
पुढ्यात आणून दे°°°
°°°भाजीत मीठ नसले तरी हसून
वेळ मारुन ने°°°
°°
°स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले
शब्द दे°°°
°°°साडी मस्त शोभतीये आज--
मनमोकळी दाद दे°°°
°°°सुटीत एखाद्या एकटीलाच
आपणहून फिरायला ने°°° °°
°मुलगीच समजून हट्ट
एखादा तूच जरा समजून घे°°° °°
°वाढदिवस
नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे°
°°
°°°वादात स्वर उंचावतातच
शांतपणे ऐकून घे°°° °°
°पुरुषप्रधान संस्कृती सोडून
माणूसपणाला थारा दे°°° °°
°झोपताना थोपटून
तिला आधाराची कुशी दे°°° °°
°जमलेच तर सुरात गुणगुणून
स्वप्नांची मोकळीक दे°°° °°
°हातात हात घेतलास लग्नात,
आता खरी साथ दे°°°
°°°नवरेपणा दूर टाकून
विसावायला प्रेमळ खांदा दे°°°
°°°अशी काहीशी साथ दे°°° °°
°मित्रत्वाचा हात दे°°°* anamik *